Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषद उत्पन्नासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ! उत्पन्नासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवर बॅनरबाजीला परवानगी या बॅनरबाजीमुळे अपघाताचा धोका कायम.



मनमाड – नागरिकांच्या जीवितहानीचा थांगपत्ता न ठेवता केवळ उत्पन्नासाठी मनमाड नगरपरिषद बिनधास्त रेल्वे ओव्हर ब्रिज वर बॅनरबाजीला परवानग्या देत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

नगरपरिषदेकडून डिजिटल फलक आणि बॅनर लावण्याकरिता शुल्क वसूल केले जाते. त्याच परवानगीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील नगीना मशीदसमोरील रेल्वे ओव्हरब्रिजवर मोठमोठे डिजिटल बॅनर, फ्लेक्स लावले जात आहेत. 

यामुळे पुलाच्या वळणावरून खाली येणाऱ्या वाहनांना समोरील वाहने दिसेनाशी होतात आणि अपघाताची भीषण शक्यता निर्माण होते.


परवानगी एक-दोन दिवसाकरिता असली तरी हेच बॅनर महिनोन्-महिने तसेच पडून राहतात. दोन-दोन महिने बॅनर काढले जात नाहीत आणि नगरपरिषदेकडून यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. 
यामुळे पुलावरून उतरताना समोरची वाहने न दिसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.


या ठिकाणी महिला, शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच गावातील नागरिकांचा सततचा वावर आहे. शिवाय हा भाग मनमाड शहराच्या मेन मार्केटकडे जाणारा असल्याने दिवसभर प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

अलिकडेच येथे एक अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पण भविष्यात या बॅनरबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत ऍड फरीदा मिठाईवाला यांनी प्रसिद्धी पत्रक देऊन तीव्र संताप व्यक्त केले."या बॅनरमुळे एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी थेट जबाबदार असतील," असा इशारा ऍड फरीदा मिठाईवाला यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिला आहे. व मागणी केली आहे की...

👉 रेल्वे ओव्हरब्रिजवर कोणत्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्स लावण्यास तात्काळ बंदी घालावी.
👉 पुल मोकळा ठेवून वाहनांना स्पष्ट दृष्टी मिळावी.
👉 नागरिकांची या ठिकाणी अपघातात जीवितहानी झाल्यास 
👉 पुल मोकळा ठेवून वाहनांना स्पष्ट दृष्टी मिळावी.
👉 नागरिकांची या ठिकाणी अपघातात जीवितहानी झाल्यास 

आमच्या तर्फे मुंबई उच्च न्यायालयात जन हीत याचिका दाखल करावी लागेल व नगरपरिषदेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
नगरपरिषदेकडून उत्पन्नासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवले नाही, तर या निष्काळजी पणाविरोधात तीव्र कारवाईचा इशाराही ऍड फरीदा मिठाईवाला यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या