मनमाड: नांदगाव मतदारसंघासाठी ऐतिहासिक क्षण! मनमाड एमआयडीसीला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे औद्योगिक वसाहत म्हणून मान्यता दिली आहे. आमदार सुहास कांदे यांनी पहिल्याच दिवशी दिलेला शब्द पाळत, मनमाड आणि नांदगाव मतदारसंघातील बेरोजगार तरुण-तरुणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनीकर्म विभागाने मौजे अनकवाडे आणि सटाणे (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील ११९.७९ हेक्टर खाजगी आणि ४.२९ हेक्टर सरकारी जमिनीला औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्षेत्राची चतुःसीमा:
- मौजे अनकवाडे: उत्तरेला गट क्रमांक १४२, १४०, १३९ आणि सटाणे गावची हद्द, दक्षिणेला वसंतनगर (ता. येवला), पूर्वेला वंजारवाडी गावची हद्द, तर पश्चिमेला मनमाड-औरंगाबाद लोहमार्ग आणि अहमदनगर-मनमाड महामार्ग.
- मौजे सटाणे: उत्तरेला गट क्रमांक ७५, मनमाड येथील गट क्रमांक १२७, १२८ आणि मनमाड-सटाणे रस्ता, दक्षिणेला अनकवाडे गावची हद्द, पूर्वेला गट क्रमांक ६५/१, ४५ पैकी, ४०, ९८, ३८, ३७, ३६ आणि नाला, तर पश्चिमेला मनमाड-औरंगाबाद लोहमार्ग.
आमदार सुहास कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून, यामुळे मनमाडसह नांदगाव मतदारसंघातील असंख्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कांदे यांनी सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दाखवलेली तळमळ आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. हा निर्णय मनमाड आणि नांदगाव मतदारसंघातील आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार असून, लहान-मोठ्या व्यावसायिकांना आणि बेरोजगारांना मोठा आधार मिळणार आहे. मनमाड एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला गती मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी प्राप्त होईल.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या