मनमाड: शहराचे सांस्कृतिक आणि सामाजिक वैभव असलेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाने आपल्या 111 वर्षांच्या शतकोत्तर वाटचालीत “व्रत अखंड वाचक सेवेचे” या ब्रीदवाक्यासह विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि वक्तृत्वकलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्व. अण्णाभाऊ साठे आणि स्व. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे भव्य आयोजन केले आहे. गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू असून, यंदा रविवार, 20 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता छत्रे हायस्कूल येथे निबंध स्पर्धा, गुरुवार, 31 जुलै 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता इंडियन हायस्कूल, लोकमान्य सभागृह येथे कथाकथन स्पर्धा आणि शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पुस्तके आणि प्रमाणपत्र स्वरूपात पारितोषिके दिली जातील, तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. स्पर्धेचे विषय आणि नियमावलीचे माहितीपत्रक मनमाड शहरातील सर्व माध्यमिक शाळांना पाठवण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत 20 जुलै 2025, सकाळी 10 वाजेपर्यंत, तर कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी 25 जुलै 2025, सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. नोंदणी मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे शाळांमार्फत करावी.
1 ऑगस्ट 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धेनंतर इंडियन हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक राहील.
मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट आणि संचालक मंडळाने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
संपर्क: मनमाड सार्वजनिक वाचनालय, ग्रंथपाल कार्यालय.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या