मनमाड: खिदमते खल्क फॉउंडेशन, मनमाड यांच्या वतीने एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मनमाड येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत फॉउंडेशनने नेहमीप्रमाणे गरजूंसाठी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमाला फॉउंडेशनचे अध्यक्ष मौलाना तौसिफ साहब यांच्यासह सर्व पदाधिकारी, शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे आणि संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांनी खिदमते खल्क फॉउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन ताजोद्दीन यांनी अतिशय उत्तमरित्या केले.
खिदमते खल्क फॉउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत आणि इतर सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने सहाय्य करत आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. फॉउंडेशनच्या या कार्याला स्थानिक समुदायाकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या