मनमाड: स्व. लोकमान्य टिळक यांच्या 169व्या जयंती आणि स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धा रविवार, 20 जुलै 2025 रोजी छत्रे हायस्कूल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. 111 वर्षांची शतकोत्तर सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या वाचनालयाने गेल्या 57 वर्षांपासून सातत्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यंदा 17 शाळांमधील 905 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सोशल मीडियाच्या प्रभावाखालील आजच्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली लेखनकौशल्ये सादर केली. सरस्वती हायस्कूल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मरेमा विद्यालय, गुरुगोबिंद सिंह हायस्कूल, के.आर.टी. विद्यालय, सेंट झेवियर्स हायस्कूल यासह अन्य प्रमुख शाळांनी यात सहभाग घेतला.
स्पर्धेचे विषय 10 दिवस आधी जाहीर करण्यात आले होते. प्रथम तीन क्रमांक आणि पाच उत्तेजनार्थ पारितोषिके पुस्तके व प्रमाणपत्र स्वरूपात 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता लोकमान्य सभागृह, इंडियन हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते वितरित केली जाणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
स्पर्धेचे यशस्वी नियोजन वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, ज्येष्ठ संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे यांच्यासह अक्षय सानप, चेतन सुतार, मंगेश वाणी, संजय गांधी, अभिषेक पितृभक्त, राहूल लांबोळे, सिद्धेश परब, प्रकाश धामणस्कर यांनी केले. ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ. नंदिनी फुलभाटी, मच्छिंद्र साळी यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाची ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरा शहराच्या वैभवात भर घालणारी ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या