Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सुभाषभाऊ माळवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौकात अभीष्टचिंतन सोहळा; सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि हितचिंतकांची उत्साहपूर्ण उपस्थिती


मनमाड:सुभाषभाऊ माळवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौक, गवळी वाडा येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या खास प्रसंगी समाजातील सर्व पक्षांचे नेते, व्यापारी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या सुभाषभाऊ माळवतकर यांच्या प्रामाणिक आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.
सोहळ्यास राजेंद्र अहिरे, सुनिल हांडगे, बबलु पाटील, मयुर बोरसे, साईनाथ गिडगे, नानाभाऊ शिंदे, ॲड. किशोर सोनवणे, बबु कुरेशी, सादिक पठाण, अमिन पटेल, सुनिल अप्पा गवळी, पिंटू वाघ, लोकेश साबळे, सचिन छाजेड, सुमेर मिसर, मकरंद कुलकर्णी, ललित रसाळ, लालाभाऊ नागरे, दत्तअण्णा थोरात, रमेश गांधी, नीलेश ताठे, प्रवीण घुगे, रुशी आव्हाड, संदीप आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन सुभाषभाऊ माळवतकर मित्रमंडळ आणि गांधी चौक मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले होते. सुभाषभाऊ यांच्या सामाजिक कार्याची आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रशंसा करत उपस्थितांनी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. हा सोहळा सुभाषभाऊ यांच्या समाजसेवेच्या प्रवासातील एक संस्मरणीय क्षण ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या