मनमाड, दि. १६ जून २०२५: वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मनमाड सार्वजनिक वाचनालयाने सलग दुसऱ्या वर्षी एक अभिनव उपक्रम राबवला. यंदा शालेय वर्षाच्या प्रथम दिनी मरेमा विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत विविध वाचनीय बाल साहित्याच्या पुस्तक भेटीने करण्यात आले. १११ वर्षांची शतकोत्तर परंपरा असलेल्या या वाचनालयाने "व्रत अखंड वाचक सेवेचे" या ब्रीदवाक्यासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करत वाचन चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.
या अनोख्या कार्यक्रमाला मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम सप्रे, सचिव कल्पेश बेदमुथा, ज्येष्ठ संचालक नरेशभाई गुजराथी, माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव पी. बी. कुलकर्णी, संचालक देवराम सदगीर, गुरुजीतसिंग कांत, वाचनालयाचे संचालक सुरेश शिंदे, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, मरेमा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल्ल देशपांडे, ज्येष्ठ शिक्षक हर्षद गद्रे, अक्षय सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक हर्षद गद्रे यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते ५० विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या पुस्तकांमध्ये भारतीय थोर राष्ट्रपुरुष, इतिहास, गड-किल्ले, पर्यावरण, संगीत, सुविचार, प्राणी-पक्षी, क्रीडा, पालेभाजी ओळख, ऊर्जा, औषधी वनस्पती, आरोग्य, वृक्ष, सण-उत्सव, भाषण आणि लेखन कला यासारख्या विषयांचा समावेश होता.
मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले की, "आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण वाचक आणि देशाचा उत्तम नागरिक बनावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या युगात वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." वाचनालयाचे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी पुढील वर्षीही मनमाडमधील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.
मरेमा विद्यालयाचे शिक्षक गोपीनाथ राठोड यांनी वाचनालयाचे आभार मानले. कार्यक्रमात मरेमा विद्यालयातील शिक्षक चेतन सुतार, प्रवीण खरोळे, ज्योती चंदनशिव, के. बी. साळुंके, विजया हंडोरे, व्ही. डी. भामरे, वर्षा ठाकूर, राजेश पाटील, बी. व्ही. पाटील, शैलेश सोनवणे यांच्यासह वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ. नंदिनी फुलभाटी, मच्छिंद्र साळी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नितीन पांडे आणि कल्पेश बेदमुथा यांनी केले.
गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासून मनमाड सार्वजनिक वाचनालय आंतरशालेय निबंध, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास निश्चितच मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या