Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

छत्रे विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ; चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव थाटात

 

मनमाड, १६ जून २०२५: येथील छत्रे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजण्याची आतुरता असलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. नव्या इयत्तेत, नव्या मित्रांसोबत शाळेत दाखल झालेल्या मुलांचे शाळेच्या वतीने औक्षण, गुलाबपुष्प आणि पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले.

शाळेचे कला शिक्षक निलेश जाधव आणि ठाकरे यांनी आकर्षक रांगोळी काढून परिसर सजवला. या प्रसंगी मनमाड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक छोटू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, ज्येष्ठ संचालक नाना कुलकर्णी, संचालक व पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे आणि ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ. संगिता पोतदार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले

.

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाखले यांनी केले, तर अशोक भोये यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या या आनंदी प्रारंभाने शाळेचा परिसर उत्साहाने भरून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या