नाशिक, १६ जून २०२५: आधुनिक काळातील तांत्रिक शिक्षणाची गरज ओळखून आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, समग्र शिक्षा योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १६६ शाळांमध्ये ‘इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर. विमला यांच्या प्रेरणेने हा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेत एक संगणक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रभावीपणे कार्यान्वित होत आहे. संगणक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, तांत्रिक कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची संधी मिळत आहे.
“आयसीटी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. याचा फायदा भविष्यात शिक्षक आणि शाळांनाही होईल,” अशी आशा डॉ. बच्छाव यांनी व्यक्त केली. श्रीमती आर. विमला यांनीही या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा, शिक्षक आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले आहे.
हा उपक्रम नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवत असून, विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील आव्हानांसाठी सज्ज करत आहे. येणाऱ्या काळात हा उपक्रम आणखी व्यापक होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अपेक्षा आहे.
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
1 टिप्पण्या
संगणक शिक्षण काळाची गरज आहे
उत्तर द्याहटवा