Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडच्या जावेद शेख यांचा प्रामाणिकपणा; ATM मधून बाहेर पडलेले 97 हजार रुपये मालकाला परत केले!


मनमाडच्या जावेद शेख यांचा प्रामाणिकपणा; ATM मधून बाहेर पडलेले 97 हजार रुपये मालकाला परत केले!

मनमाड, दि. १ मे २०२५: माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श उदाहरण म्हणून मनमाड क्रिकेट असोसिएशनचे सचिव, एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कर्मचारी तसेच प्रसिद्धीप्रमुख जावेद मुश्ताक शेख यांचे नाव आज सर्वांच्या ओठांवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड येथील एच.डी.एफ.सी. बँकेच्या ए.टी.एम.मधून चुकून बाहेर पडलेले ९७ हजार रुपये त्यांनी मूळ मालक श्री. रमेश गांधी यांना प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

घटना अशी घडली की, जावेद शेख हे पैसे काढण्यासाठी एच.डी.एफ.सी. बँकेच्या ए.टी.एम.मध्ये गेले होते. त्यांनी आपले कार्ड टाकताच, बँकेची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच ए.टी.एम.मधून ९७ हजार रुपये बाहेर आले. हे पैसे त्यांचे नसल्याचे लक्षात येताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तात्काळ आपले मित्र फिरोज शेख यांना याबाबत माहिती दिली. दोघांनी मिळून ए.टी.एम.मध्ये यापूर्वी आलेल्या खातेदारांचा शोध घेतला. त्यावेळी ही रक्कम व्यापारी रमेश गांधी यांची असल्याचे स्पष्ट झाले.

फिरोज शेख यांनी रमेश गांधी यांच्याशी संपर्क साधून त्यांना जावेद शेख यांच्याकडे पाठवले. जावेद यांनी ९७ हजार रुपये रमेश गांधी यांना कसलीही अडचण न करता परत केले. या प्रामाणिक कृतीबद्दल रमेश गांधी यांनी जावेद शेख यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्या माणुसकीचे कौतुक केले.

जावेद शेख हे फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे मार्गदर्शक शेख मुश्ताक यांचे चिरंजीव असून, त्यांनी आपल्या कृतीतून माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा एक आदर्श निर्माण केला आहे. समाजात अजूनही सच्चेपणा आणि विश्वास टिकून आहे, याची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून करून दिली. त्यांच्या या कार्याबद्दल मनमाडसह परिसरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

जावेद शेख यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रामाणिकपणाचे महत्त्व पटले आहे. अशा व्यक्ती समाजाचा खरा आधार असतात, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या