रोटरी क्लब ऑफ मनमाडचा स्वयंरोजगार निर्मितीसाठी पुढाकार: १८ गरजू महिलांना शिलाई मशीन वितरण
मनमाड, २७ एप्रिल २०२५: रोटरी क्लब ऑफ मनमाड यांच्या वतीने स्वयंरोजगार निर्मितीच्या उद्देशाने एक पाऊल पुढे टाकत, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या आवाहनाला प्रतिसाद देत १८ गरजू महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला क्लबचे सदस्य, उपस्थित महिला आणि मान्यवर उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० कडून उपलब्ध झालेल्या या १८ शिलाई मशीन गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमाचे उद्दिष्ट क्लबचे रोटे. गुरुजीत सिंह कांत यांनी आपल्या मनोगतातून विशद केले. क्लबचे अध्यक्ष रोटे. कौशल शर्मा यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट आणि क्लबच्या सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानले तसेच उपस्थित महिलांना रोटरीच्या सेवाकार्याची माहिती दिली. रोटे. डॉ. धीरज बरडिया यांनी शिलाई मशीन वापरासंदर्भातील सूचना सादर केल्या, तर रोटे. दिनेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. क्लबचे सचिव रोटे. डॉ. भुषण शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला रोटरीचे ज्येष्ठ सदस्य रोटे. देवराम सदगीर, रोटे. आनंद काकडे तसेच महिला सदस्य सौ. रविंदर कौर कांत आणि सौ. लीला सदगीर उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी रोटरीच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट आणि मनमाड क्लबचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७ निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सर्व सदस्यांसह पल्लवी केटरर्सच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.रोटरी क्लब ऑफ मनमाडचा हा उपक्रम गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रेरणा देणारा आणि समाजसेवेचा आदर्श ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या