"नगरपालिकेची ढिसाळ कारभार! मनमाड नगीना मस्जिद समोरील मेलेला कुत्रा अद्याप उचलला नाही, नागरिक हैराण"

मनमाड शहरातील नगीना मस्जिद समोरील रोडवर गेल्या काही दिवसांपासून एक मेलेला कुत्रा पडलेला आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरीही मनमाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नगरपालिकेच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार वृत्तीमुळे नागरिकामध्ये संताप व्यक्त होत आहे. "कुत्रा उचलण्यासाठी किती वेळ लागणार? आम्हाला या दुर्गंधीत किती दिवस जगायचं?" अशी विचारणा स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.

नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. मेलेला कुत्रा उचलण्यासारखी साधी जबाबदारीही पार पाडण्यात नगरपालिका अपयशी ठरत आहे, ही बाब लज्जास्पद आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म हलत नाही, हे शहराच्या स्वच्छतेविषयी नगरपालिकेची उदासीनता दर्शवते. आता तरी नगरपालिकेने तातडीने पावले उचलून हा कुत्रा हटवावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, यापुढे नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.