Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक: मनमाडमध्ये 39 व्या वर्षी श्रीराम नवमीचा उत्साह

 


भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक: मनमाडमध्ये 39 व्या वर्षी श्रीराम नवमीचा उत्साह



मनमाड: सालाबादप्रमाणे यंदाही मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने 1986 पासून सलग 39 व्या वर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी चैत्र शुद्ध नवमीला मनमाड शहरातील श्रीराम मंदिर, आठवडे बाजार येथे हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

सकाळी 7 वाजता महाभिषेक पूजेने या उत्सवाला सुरुवात होईल, त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म भजन आणि जन्मोत्सवासह महाआरती होईल. सायंकाळी 5:30 वाजता पारंपरिक पद्धतीने भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक निघणार असून, रात्री 9 वाजता पुन्हा महाआरतीने कार्यक्रमांची सांगता होईल. 


मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समितीने सर्व श्रीराम बंधू-भगिनींना या धार्मिक कार्यक्रमांत आणि रथ यात्रा मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे. हा सोहळा मनमाड शहरातील भक्तीमय वातावरणाला आणखी उंचीवर नेईल, अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या