Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गुणवंत शिक्षक पुरस्काराची घोषणा: मनोज ठोंबरे यांचा सन्मान

 

गुणवंत शिक्षक पुरस्काराची घोषणा: मनोज ठोंबरे यांचा सन्मान

येवला, दि. १ एप्रिल २०२५: नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मनोज ठोंबरे यांना नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने प्रतिष्ठित ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अर्थवाहिनी म्हणून कार्यरत असलेल्या या सोसायटीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गुणवंत शिक्षकांची निवड केली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष शांताराम देवरे असणार असून, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या प्रसंगी येवला तालुका संचालक गंगाधर नानासाहेब पवार, सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 मनोज ठोंबरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात येत असून, या पुरस्कारामुळे शिक्षक समुदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या