मनमाड शहराला पाणीपुरवठ्याची नवी आशा: बाळासाहेब ठाकरे करंजवण योजनेची यशस्वी चाचणी

मनमाड, दि. 25 एप्रिल 2025: मनमाड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेल्या हिंदुरुदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेची यशस्वी चाचणी आज पार पडली. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी आणि अंतर्गत पाइपलाइनमध्ये पाणी भरून ही चाचणी पूर्ण करण्यात आली.

या योजनेच्या माध्यमातून मनमाड शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राजू जाधव, अमोल दंडगव्हाळ, अनिल देवरे, सचिन दरगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुहास कांदे यांनी या योजनेच्या यशस्वीतेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. ही योजना शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लवकरच ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन मनमाडकरांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले.