आरटीई अंतर्गत रिक्त २५ % टक्के आरक्षित जागांवर २०२४-२५ प्रवेश घेण्यासाठी दि. १६ एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करता येणार.
कादीर शेख, जिल्हा सचिव, वंचित बहुजन आघाडी,
आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या २५ % टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी पालकांना दि. १६ एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.जास्ती जास्त गरजू लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान करण्यात येत आहे,
मनमाड :- आरटीई पाेर्टलवर तब्बल दीड महिने चार ते पाच वेळा मुदतवाढ देत शाळा नाेंदणीसह रिक्त जागांची आकडेवारी अद्ययावत केल्यानंतर अखेर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळाला आहे.
आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या २५ % टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी आर्थिक दुर्बल असलेल्या पालकांना दि. १६ एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आरटीई पाेर्टलवर शाळांची नाेंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग घटकांकरिता २५ % टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सुरूवात हाेते. मात्र, यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला तब्बल दाेन महिने उशिराने सुरूवात झाली आहे. त्यात दीड महिना केवळ शाळांची नाेंदणी करण्यामध्ये गेला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्यास केव्हा सुरूवात हाेणार? याची पालक मागील अनेक महिन्यापासून अतुरतेने वाट पाहत हाेते.
ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा करावा.?नियमावली, कागदपत्रे आदींबाबबत आरटीई पाेर्टलच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे. तरी मनमाड शहरासह तालुका व जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल पालकांनी जास्तीत जास्त सदर योजनेचा लाभ घ्यावा, आपणास ऑनलाईन प्रक्रियेत भाग घेण्यास फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, आमच्यातर्फे निशुल्क मोफत (मार्गदर्शन) मदत केली जाईल, असे आव्हान वंचित बहुजन आघाडी,जिल्हा सचिव, कादीर शेख, तर्फे करण्यात आले आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या