जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.
मनमाड.दि. १५/०४/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अन्दर खान, रा. संगमेश्वर, मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा असतांना, त्याचा मित्र नामे रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक व त्याचेसोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून, मागील भांडणाची कुरापत काढून युवक नामे रफिक खान यास शिवीगाळ करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून जिवे ठार मारले बाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुरनं ११७/२०२४ भादवि कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपीतांनी पलायन केले होते.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, सहा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंग संधु, सहा. पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांनी, यातील आरोपीतांना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक, वय २८, रा. संगमेश्वर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार फैसल पुर्ण नाव माहित नाही याचेसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस ठाणेस वरील गुन्हयात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे. यातील आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते, त्यास स्थागुशाचे पथकाने दोन तासांचे आत ताब्यात घेऊन त्याचेकडून
गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल देखील हस्तगत केली आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, सहा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंग संधु, सहा. पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, पोउनि संदिप पाटील, पोहवा वेतन संवत्सरकर, पोना शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांचे पथकाने सदर खुनाचे गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.