Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात अंधाराचे सामराज्य ट्रिस्ट लाईट बंद मनमाड शहरात चोरीचा घटनेत वाढ

 


(मनमाड प्रतिनिधी गणेश देशमुख.) शहरात गेल्या काही दिवसापासून शहरात अचानक स्ट्रीट लाईट बंद झाल्याने.शहरात अक्षरशा अंधाराचे सामराज्य पसरल्याचे बघावयास मिळत असून.शहरातील नागरीकांना यामुळे मोठा ञास सहन करावा लागत असून, महापुरुषांचे पुतळे देखील अंधारात आहे, शहरात ऐण सणासुदीचा आणि महापुरुषांचा जयंती उत्साहाचा काळात चौफेर अंधारामुळे शहरातील लाईट बंद असल्याने अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी राञीचा वेळी चोरीचा घटनेत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे,या कडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन.मनमाड शहरातील नागरीकांना होणारा ञासातून नागरीकांची सुटका करावी.अशी भावना शहरातील नागरीक व्यक्त करतांना दिसत आहेत.शहर व परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने.शहरात वाहन चोरीचा व भुरटया चोरीचा घटनेत मोठी वाढ झाली असून,शहर पोलीस स्टेशन मार्फत राञीचा वेळी पोलीस प्रशासनाने पोलीस गस्त वाढविण्याचे गरज असून.त्यामुळे शहरात होणारा आशा प्रकारचा घटनेला आळा बसेल,असे नागरीक बोलून दाखवत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या