जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

तरी साद्या कागदावर एफिडेव्हीड केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यात यावे मानव अधिकार रक्षक मंच तर्फे निवेदन द्वारे मागणी, 

मनमाड :- महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी 1 जुलै 2004 रोजीचे, मुद्रांक शुल्क माफ बद्दल परिपत्रक आदेश जारी केलेले आहे तसेच महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 12 मे 2015 रोजी मुद्रांक शुल्क माफ बाबत शासन निर्णय देखील जारी केले आहे तसेच अर्थ व सांख्यीक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी देखील मुद्रांक शुल्क माफ बाबत दि 21/09/2015 रोजी परिपत्रक,काढलेले आहे, 
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांनी देखील दिनांक 16/11/2021 रोजीचे मुद्रांक शुल्क माफ बाबत आदेश पारित केलेले आहे तसेच 

सर्वात महत्वाचे म्हणजे, मा, मुंबई उच्च न्यायालय यांनी खटला क्र 58/2021, "भुषण ईश्वर महाजन" विरुद्ध "महाराष्ट्र शासन," या केस मध्ये दिनांक 11/10/2021 रोजी आदेश दिलेले असून आदेशात नमुद आहे की,न्यायालय व शासकीय कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञात्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे, नागरिकांना मुद्रांक शुल्क बाबत सख्ति करता येणार नाही,
               व्हिडिओ बघण्यासाठी दोन वेळा क्लिक करा

तरी देखील आपल्या मनमाड नगर परिषद तर्फे बेकायदेशीररित्या मनमानी पद्धतीने प्रतिज्ञापत्र करीता 100 रु बॉण्ड नगरींकाकाढून घेतले जात आहे,
आपल्या मनमाड नगर परिषद तर्फे जन्म नोंदीत नाव दुरुस्ती व इतर कारनाने तसेच आपल्या नगर परिषद मध्ये इतर शासकीय कामास नागरिकांकडून सर्रास पणे 100 रु बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र घेतले जातं आहे,

तरी आमची सबब मांगणी आहे की, संदर्भ 1 ते 5 नुसार शासनानी प्रतिज्ञापत्र सादर करतांना मुद्रांक शुल्क माफ केले आहे तरी आपल्या मनमाड नगर परिषद तर्फे प्रतिज्ञापत्रा साठी 100 रुपय बॉण्ड ची मागणी करू नये व साद्या कागदावर एफिडेव्हीड केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यात यावे, प्रतिज्ञापत्र हे सध्या कागदावर करण्यात यावे असे लिखित आदेश नगर परिषद तर्फे काढण्यात यावे,

अन्यथा मनमाड नगर परिषद च्या या बेकायदेशीर गैर कारभारा विरुद्ध महाराष्ट्र राज्य चे संबंधित विभागात तक्रार केली जाईल व वेळ आल्यास मुंबई उच्च न्यायालयात PIL देखील दाखल करण्यात येईल, तरी मनमाड नगर परिषद तर्फे प्रतिज्ञापत्रा साठी 100 रुपय बॉण्ड ची मागणी करू नये व साद्या कागदावर एफिडेव्हीड केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यात यावे अशी मागणीचे निवेदन मानव अधिकार रक्षक मंच तर्फे मनमाड नगर परिषदला देण्यात आहे या वेळी मानव अधिकार रक्षक मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे, जिल्हा सचिव वसीम शेख, जिल्हा पदधिकारी, वसीम शेख (बब्लू मियाँ ), विशाल छाजेड, आबिद शेख, पापा पठाण, राहील पटेल,इतर उपस्थित होते,