अभोणा पोलीस ठाणे हद्दीत दि. ०८/०३/२०२४ रोजी रात्रीचे वेळी अभोणा ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. यातील अनोळखी मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून दि. ०९/०३/२०२४ रोजी अभोणा पोलीस ठाणेस गुरनं ३३/२०२४ भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात यातील आरोपी यांनी कोणताही धागा दोरा मागे न ठेवता मयताची ओळख पटू नये म्हणुन निर्जनस्थळी सदरचा मृतदेह जाळला होता.
सदर खुनाचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग श्री. किरण सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, अभोणा पो.स्टे. चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सीक टिम व श्वानपथकास पाचारण करण्यात आले. तसेच मयताच्या शरीराचे निरीक्षण केले असता, त्याचे अंगावर मिळून आलेल्या चीज वस्तू व चेहरा यावरून त्याची ओळख पटविण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे तसेच नजीकचे जिल्हयांमध्ये मयताचे वर्णनासह तपासयाद्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या. परंतु मृतदेहाची ओळख पटविष्यात अपयश येत होते. सदर खुनाचे गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासुन सलग सात दिवस कनाशी व अभोणा परिसरात तळ ठोकून गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. घटना घडली त्यादिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्यात सिध्देश्वर मंदिर येथे जत्रा असल्याने अभोणा ते कनाशी रोडवर वर्दळ होती. त्याप्रमाणे घटनास्थळाचे आजुबाजूचा परिसर तसेच नजीकच्या पाडयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती घेतली असता, घटनेच्या दिवशी एक काळे रंगाची फोर व्हीलर कनाशी रोड परिसरात आली असल्याची पुसटशी माहिती पथकास मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून घटनास्थळ परीसरात मिळुन आलेल्या भौतिक व तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळालेल्या माहीतीव्दारे ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील काळया रंगाचे इनोव्हा कार चालक/मालकाबाबत गोपनीय माहिती घेवुन भिवंडी व मुंब्रा येथून खालील संशयीतांना ताब्यात घेतले.
१) शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख, वय ४६, रा. रूम नं. २३, खालीदशेठ चाळ, भिवंडी, जि. ठाणे, २) सादिक इब्राहिम खान, वय ४८, रा. वारसी टॉवर, ४०२, सावरकर नगर, मुंब्रा, जि. ठाणे ताब्यात घेतलेल्या वरील दोन्ही संशयीतांना गुन्हयाचे तपासात, विश्वासात घेवून कसोशीने चौकशी केली असता
दि. ०८/०३/२०२४ रोजी ते दोघे व त्यांचेसह आणखी तीन इसम हे भिवंडी येथून मालेगाव शहरात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे चौकशी केली असता, यातील संशयीत शहानवाज उर्फ बबलु व साजीदखान यांचेसह तिसरा इसम हा शहारूफ खान आला असल्याचे समजले, त्याबाबत खात्री केली असता त्याचे पुर्ण नाव शहारूफ खान मेहबुब खान, रा. सेक्टर नं. १५, वाशी, नवी मुंबई, मुळ रा. आझमगड, उत्तरप्रदेश असे असल्याचे निदर्शनास आले. त्याचा फोटो प्राप्त करून मयताचे वर्णनाशी व त्याचे नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील मयत हा शहारूफ खान हाच असल्याचे निष्पन्न झाले असून नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मयताची ओळख पटली आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली काळया रंगाची इनोव्हा कार क्र. MH-01-AE- 0008 या वाहनासह त्यांचे वापरते मोबाईल गुन्हे तपासकामी जप्त करण्यात आले असुन आरोपीना गुन्हयाचे पुढील तपासकामी अभोणा पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
एकंदरीत तपासात संशयीत आरोपी नामे शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख व सादिक इब्राहिम खान हे फोर व्हिलर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून घटनेच्च्या दिवशी ते मालेगाव शहरात फोर व्हिलर कार बघण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांचे मालेगाव येथील अन्य साथीदारांसह (नावे निष्पन्न झालेली आहे) आपसात संगनमत करून मयत शहारूफ खान मेहबुब खान याचे वर्तनाला कंटाळून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो बेशुध्द झाल्यानंतर, तो मयत झाला आहे असे समजून मालेगाव पासून इनोव्हा कारने अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील निर्जनस्थळी येवून सदर ठिकाणी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर खुनाचे गुन्हयाचे तपासात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग श्री. किरण सुर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि संदिप पाटील, पोहवा नवनाथ सानप, वेतन संवस्तरकर, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, योगेश कोळी, प्रदिप बहिरम, शरद मोगल, चापोहवा भवर, विकी म्हसदे यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या