Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बार्शी तहसीलदारावर शासकीय कार्यक्रमाचा गैरवापर करून भाजप प्रचारासाठी मदत केल्याचा आरोप!

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


बार्शी -: तालुका बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांच्यावर शासकीय कार्यक्रमाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्ष (भाजप) साठी प्रचार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. 12 मार्च 2024 रोजी आयोजित "समाधान शिबिर आणि निवडणूक जनजागृती कार्यक्रम" मध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार प्रवीणसिंह परदेशी, आमदार राजेंद्र राउत, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रमेश पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.


तक्रारदाराचा आरोप आहे की हा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या "मतदान जनजागृती अभियान" च्या नावाखाली आयोजित करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात भाजपसाठी प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले नाही, ज्यामुळे आदर्श निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन झाले आहे.
शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाला मतदान करण्याचा दबाव येण्याची शक्यता आहे.
तक्रारदाराने निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज देऊन तहसीलदारावर कारवाईची मागणी केली आहे.


तक्रारदाराने आरोप केले आहेत की तहसीलदाराने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे आणि त्यांच्यावर आदर्श_निवडणूक जनजागृतीच्या आचारसंहितेचे तसेच निवडणूक आयोगाचे नियम व अटी याचे उल्लंघन केल्याबद्दल या प्रकरणाची खाते अंतर्गत चौकशी करून निवडणूक कायदे आणि भारतीय दंड संहिता कलमातील वर्णित अपराध घडत असल्याने तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व शासन निधीतून पक्षाचा प्रचार यापुढे होणार नाही असे आदेश महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांना त्वरित देण्यात यावेत.


निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी मंत्रालय, सचिव महसूल मंत्रालय, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तक्रारीची दखल घेतील आणि तहसीलदारावर कारवाई करतील का हे पाहावे लागेल.
हा वाद निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम करेल हे देखील पाहावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या