Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारीची मुजोरी, एस टी कंडक्टर ने 75 वर्षीय वृद्धाची गच्ची धरून हिंसक वागणुक दिली,

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


येवला :- एसटी महामंडळाचे कडू अनुभव प्रत्येकाला आलेलाच असेल, असेच एसटी महामंडळाचे कडू अनुभव एका 75 वर्षीय वय वृद्ध घुगे या आजोबास आलेला आहे,

दि 18/03/2024 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या नाशिक औरंगाबाद या एस टी ने नाशिक येथून 75 वर्षीय घुगे बाबा हे 
येवला साठी शिवशाही एस टी मध्ये बसले होते, 

गाडी सुरू झाली असता दोन पाच मिनिटातच कंडक्टर हे घुगे बाबा यांच्या जवळ आले व तिकीट तिकीट ओरडत होते,
75 वर्षे ज्याचं वय आहे त्या माणसाला एसटी महामंडळ शंभर टक्के फ्री प्रवास करायची योजना आहे म्हणून 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी आपले जवळ असलेले आधार कार्ड कंडक्टर साहेब यांना दाखवलं, घुगे बाबा यांच्या आधार कार्डवर एक सहा 1948 अशी जन्म तारीख होती, जन्म तारखेच्या हिशोबाने त्यांचे वय 75 वर्षे आणि नऊ महिने होते,

परंतु या गाडीच्या कंडक्टरला,75 वर्षे व्यक्तीस शंभर टक्के प्रवास फ्री योजना योजना आहे बाबत माहित नाही की काय.? असं म्हणावं लागेल, कारण कंडक्टरनी लगेच 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबाकडे शंभर रुपयाची मागणी केली, या वर 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी योजने नुसार मला प्रवास फ्री असल्याचे म्हणत कंडक्टरास विनंती केली परंतु कंडक्टर साहेबांनी 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबाशी वादविवाद करत गाडीच्या खाली उतरा अशी धमकी दिली व 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा बळजबरीने येवल्याचे हाफ तिकीट काढायला लावले,

75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा हे योजनेत बसत असतांना देखील नाईलाजाने तिकीट विकत घ्यावे लागले म्हणून 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी येवला बस स्थानक वर पुन्हा एकदा कंडक्टर साहेबानं बरोबर चर्चा केली की मला फ्री तिकीट का दिले नाही शंभर रुपये का घेतले तर या कंडक्टर साहेबांनी 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांना थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली व 75 वर्षीय वयवृद्ध व्यक्तीचे गच्ची धरून त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे, या सर्व घटनेचा 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी मोबाईल शूटिंग काढायचा प्रयत्न केला असता कंडक्टर साहेबांनी मोबाईल पण हिसकून घेतला,
 येवला बस स्थणकवर 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी एस टी कंडक्टर यांना मांगणी केली की, 

तुम्ही माझे शंभर रुपये घेऊन मला तिकीट का दिले तुम्ही माझे शंभर रुपये परत करा या योजनेमध्ये मी बसतो मला फ्री तिकीट आहे,तरीदेखील कंडक्टर ऐकायला तयार होईना शेवटी येवला कंट्रोल कॅबिन मध्ये जाऊन कंडक्टरने कंट्रोल रूम मध्ये ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला बोलावले आणि त्या अधिकाऱ्याला कंडक्टर यांनी 

खोटं नाट सांगायला सुरवात केली की, याच बाबांनी मला शिवीगाळ केली आणि गच्ची धरली तेवढ्यात गाडीमधील प्रवाशांनी कंडक्टरची चूक आहे असं सांगितलं विशेष म्हणजे गाडीतील काही प्रवासी तर काका शंभर रुपयासाठी नका वाद घालू म्हणत घुगे बाबांना शंभर रुपये द्यायला देखील लागले होते, 

अधिकाऱ्याला समक्ष घुगे बाबांनी सांगितले की माझं वय 75 च्या पुढे आहे शंभर टक्के प्रवास करण्याची योजना आहे, तरी माझ्या कडून या कंडक्टर साहेबांनी शंभर रुपये घेऊन, मला वाईट वागणुकी दिली व माझी गच्ची धरली आहे, 
प्रकरण अंगाशी येत आहे बघुन येवला एसटी कंट्रोल रूम मधील अधिकाऱ्यांनी बळजबरी शंभर रुपये 75 वर्षीय घुगे बाबाच्या खिशात घातले आणि बाहेर पाठवून दिले,

या सर्व घटनेचा सुमारे साडे अकरा वाजता येवला शहर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कंडक्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे, आता या तक्रारीची दखल संबंधित एसटी महामंडळ व पोलीस स्टेशन कधी घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, व 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांची गच्ची धरणाऱ्या दोषी कंडक्टर वर कडक कारवाई व्हावी अशी मांगणी करण्यात येत आहे, तसेच 75 वर्षीय वयवृद्ध घुगे बाबा यांनी जन आवाज न्युज शी बोलतांना येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या एन.सी.आर. झेरॉक्स कॉपी देखील दिली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या