Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमास अटक एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेनिहाय सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमावर कारवाई केली आहे.

दि. ०४/०३/२०२४ रोजी अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एक संशयीत इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती

 त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात सापळा रचुन संशयीत नामे गणेश लक्ष्मण हाके, वय २६, रा. गोजरे मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द सिन्नर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलीस ठाणेस संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, पोहवा चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, हेमंत गरूड, पोकों विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या