Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ ग्रंथपाल मन्सूरी अब्दुल हमीद, मराठी माध्यमाचे पर्यवेक्षक शेख आरिफ कासम,उपशिक्षक राहूल कडनोर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मराठी माध्यमाचे पर्यवेक्षक शेख आरिफ कासम,उपशिक्षिका सविता सचिन कराड,दखने आरती चंद्रशेखर यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी मॅडम, मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या