मा. उप सचिव सामान्य प्रशासन यांनी वहीद खान यांनी केलेल्या तक्रारी, ईमेल, ई-ऑफिस वर प्रलंबित बाबतीत केलेला पत्रव्यवहारा ची खास दखल घेऊन , शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र. क्र.०२/र.व.का.१/१८ दिनांक १८/१२/२०२३ रोजी हे काढले.
प्रतिनिधी.सध्या शासनाने भारत सरकारचा सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील पत्रव्यवहार व दैनंदिन कामकाज आवक जावक नोंदी पत्रव्यवहार इत्यादी इत्यादी लेखी तोंडी व सर्व माध्यमातून होत असलेले कम्युनिकेशन हे इंटरनेट ऑनलाइन फायलिंग इत्यादी माध्यमातून सर्व डाटा व पत्रव्यवहार नोंदी ह्या जपून राहाव्या व जतन दीर्घकाळापर्यंत व्हाव्यात यासाठी नवनवीन योजना संकल्पना अमलात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कार्यप्रणाली माध्यमे वाढव करतअसून सर्व शासकीय व शासकीय कार्यालय यांना सर्वांगीण आर्थिक मदत व उपकरणे व मनुष्यबळ इत्यादी सर्व बाबी या उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु भरपूर प्रमाणात सर्वच विभागांमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये जनसामान्यांनी केलेले पत्रव्यवहार व शासनाचे अंतर्गत पत्र व्यवहार विशेष म्हणजे समस्येविषयी ही पोर्टल वरती ऑनलाईन ईमेल्स वरती माध्यमातून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारी याची विशेष नोंद घेऊन त्या योग्य ते मार्गे निराकरण करण्यासाठी योग्य ते पुढील कारवाया करणे बाबत विशेष शासनाची मोहीम अध्यादेश परिपत्रके असताना सुद्धा जाणीवपूर्वक कर्म चारी हे कर्तव्यात कसूर करून कायद्याची अंमलबजावणी करताना दिसून येत नसल्याचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते वहीद गफार खान यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी 800 च्या वर तक्रारी व ई-मेल्स इत्यादी बाबी शासनापर्यंत सचिव मंत्रालयापर्यंत पोहोचती केल्या या सर्व पाठपुरावाचा व तक्रारीं ची दखल घेऊन सामान्य प्रशासन माननीय उपसचिव यांनी सदर कायद्याची प्रणाली अद्यावत पद्धतीने वापरावी याबाबत खालील प्रमाणे शासन परिपत्रक दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये
राज्य शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज व माहिती सुरक्षित रहावी, तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी याकरिता मंत्रालयीन विभागांमधील तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांनुसार देण्यात आल्या आहेत. मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागांमधील तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाजात दि.०१ एप्रिल, २०२३ पासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी संदर्भाधीन परिपत्रक दिनांक २३ फेब्रुवारी, २०२३ अन्वये मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
२. ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी बाबतची कार्यपद्धती विहित करून जवळपास सात महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही काही विभागांमध्ये अद्यापही Physical नस्त्या तयार करून नंतर ती स्कॅन करून ई-ऑफिस प्रणालीवर अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येत आल्याचे निदर्शनास आले आहे. सामान्य प्रशासन, नियोजन, वित्त, विधि व न्याय इत्यादी विभागांनी त्यांच्याकडे अभिप्रायार्थ प्राप्त होणाऱ्या नस्त्या या केवळ ई-ऑफिस प्रणालीद्वारे स्विकारणे आवश्यक आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी खालील निर्देश दिले आहेत- अ) सर्व मंत्रालयीन विभागांमध्ये १०० टक्के ई-ऑफिस प्रणालीमध्ये संपूर्ण नस्ती ग्रीन शिटवर तयार करून ती Digital Signature/E Signature च्या माध्यमातूनच पुढे सादर करण्यात यावी, ब) मंत्रालयीन विभागांमध्ये Physical नस्ती तयार करून नंतर ती स्कॅन करून ई-ऑफिस प्रणालीवर अपलोड करण्याच्या कार्यपद्धतीचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब करण्यात येवू नये. उपरोक्तनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानुसार वरिलप्रमाणे कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल त्वरित या विभागास सादर करावा. असे निर्देश आदेश सुचवले आहेत. त्यामुळे सदर परिपत्रकाचे काटेकोर पणे पालन, अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना कारवाईस सामोरे जावे लागेल सदरचा आदेश परिपत्रक निघाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून समाजसेवक वहीद गफार खान यांचे फार कौतुक करून आभार मानले जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या