Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड आठवडे बाजार पांझन नदी पुलावरील डीपी, जळाली, विद्दूत पुरवठा 8 तासा पेक्षा जास्त खंडित असल्याने सर्वसामान्य नागरिकांना झाला त्रास,

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

 मनमाड:- तीन मिनिटाच्या पावसामुळे  मनमाड शहरात तीन तास विद्युत पुरवठा खंडित, तर एक तासाच्या पावसामध्ये अख्या रात्र विद्युत पुरवठा खंडित ही  मनमाड शहरातील नागरिकांना सवय झालेली असताना, अत्ता मनमाड शहर विद्युत वितरण कंपनीच्या नावे एक अजून  पराक्रम नोंदविण्यात यावे, असे त्रस्त  नागरिकांतर्फे उग्र प्रतिक्रिया आले आहे,

 आता काही महिन्यापूर्वीच बसवलेल्या डीपी मध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन डीपी जळाली, अन डीपी ची वायर जळाली म्हणून विद्युत वितरण कंपनीतर्फे थेट आठ तास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा पराक्रम करण्यात आलेला आहे,

 विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संबंधित विभागातील नागरिकांची गैरसोय झाली आहे, नागरिकांनी MECB ऑफिसच्या 02591222384 दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो नंबरच लागत नाही, नंबर लागला तर समोरून  पद्धतशीर माहिती मिळत नाही, संबंधित विभागाच्या वायरमेन ला फोन केले तर ते दुसऱ्या वायरमेनाचे नंबर देतात, दुसऱ्या वारमेनास फोन केला तर ते, तिसऱ्या वारमेनाचे  नंबर देतात, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे,

 सदर डीपी जळाली सकाळी 09:- वाजता अन मनमाड विद्युत वितरण कंपनीने, काम सुरु केले दुपारी 02: वाजता, या विलंबा मुळे नागरिकांना ना हक त्रास सहन करावा लागतो,

मनमाड विद्युत वितरण कंपनीने, चांगल्या दर्जाचे कामे करावे वारंवार विद्युत पुरवठा खंडित करून, ग्राहकांना मिळालेल्या ग्राहक कायद्याअन्वये अधिकाराचे भंग करू नये, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या