नाशिक विशेष प्रतिनिधी.गणेश देशमुख .मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाणेस गुरनं २२/२०२४ भादवि कलम ३०२, ५०६, १२० (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दिनांक ०६/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. ०५/०२/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील ओवाडी नाला, रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान, वय २९, रा. नागछाप झोपडपट्टी, मालेगाव याने मसूद गांजावाला याचा गांजा पकडून दिला व आरोपी युसूफ छिवडा याचे मुलीस पळवून नेऊन लग्न केले या कारणावरून, यातील आरोपीतांनी संगनमत करून कट रचून मयत हा मोटरसायकलने जात असतांना त्याचेवर हल्ला करून त्याचे डोक्यात पिस्तुलमधून गोळी मारून त्यास जिवे ठार मारले म्हणून फिर्यादी इस्माईल खान इसा खान, रा. नागछाप झोपडपट्टी, मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानूसार अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर श्री. तेघबीर संधु, रमजानपूरा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिटचे सपोनि हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून घडले परिस्थीतीची पाहणी केली. सदर गुन्हयात आरोपी नामे १) शेख युसूफ शेख बुडन कुरेशी उर्फ युसूफ छिचडा, वय ५३ वर्षे, २) रियान शेख युसूफ शेख, वय २० वर्षे, दोन्ही रा. देवीचा मळा, दानिश पार्क, मालेगाव यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत सदर गुन्हयात घटनास्थळावर मिळालेले भौतिक पुरावे, सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता, यातील आरोपी रियान शेख याने मयत इब्राहिम यास पिस्तूलमधून गोळी मारून जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुली दिली होती.
पुढील तपासात यातील मुख्य आरोपी रियान शेख युसूफ शेख यास गुन्हा करण्यासाठी पिस्तुल पुरविणारा आरोपी नामे ३) शेख शहजाद शेख रफिक, वय २३, रा. जाफरनगर, मालेगाव, हल्ली गिझर्झा कॉलनी, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद यास औरंगाबाद जिल्हयातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी रियान शेख याने गुन्हयात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपी रियान शेख याने गुन्हा केल्यानंतर त्यास घटनास्थळावरून आरोपी नामे ४) समीर शेख शब्बीर, वय-१९ वर्ष, रा निहालनगर, गल्ली नंबर ०५, अवलिया मरिजद जवळ, मालेगांव, ता. मालेगांव जि. नाशिक याने त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर आरोपी क्रमांक ०२ यास बसवुन तेथुन पळून जाण्यासाठी मदत केली आहे. आरोपी समीर शेख शब्बीर यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रमजानपुरा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.
वरील खुनाचे गुन्हयात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री. तेघबीर संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, रमजानपुरा पो.स्टे. वे सपोनि श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, स्थागुशाचे सपोनि श्री. हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, पोना देविदास गोविंद, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, गिरीष बागुल, तसेच रमजानपुरा पो.स्टे. चे पोहवा दिपक खैरणार, पोना राजु चौधरी, सचिन वराडे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या