Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.

 


  मनमाड:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराणे येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार के.के. यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.मवाळ एस.बी.यांनी प्रास्ताविक केले तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार के. के. यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती विशद करतांना अखंड भारताच्या एकीकरणासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांची वकृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वकृत्व स्पर्धेत कु.गांगुर्डे प्रवीण भगवान या विदयार्थ्याचा प्रथम क्रमांक आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गावित एम.एम. व आभार प्रा. गवळी ए.के. यांनी केले.यावेळी सहा.प्राध्यापक व कार्यालयीन सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या