Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण देण्यात यावा, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन द्वारे मागणी 

मनमाड :- नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने नांदगाव तालुक्याला तीव्र स्वरुपाच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील नागरिक, माताभगिनी, शेतकरी, शेतीवर काम करणारे हातमजुर, व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. सर्वत्र शेतजमीनी ओसाड पडल्या आहेत, विहिरींनी व बोअरींगने तळ गाठला आहे त्यामुळे फक्त शेतीच नाही तर जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बाहेरगावहून मोठ्या प्रमाणात चारा विकत आणावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नांदगाव तालुक्यातील परिस्थिती गंभीर असतानाही शासनातर्फे नांदगाव तालुक्याबाबत दखल घेतली जात नाही, नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा म्हणून शासन दरबारी वेळोवेळी निवेदनाद्वारे कळविण्यात आले, आहे

विविध स्तरावर आंदोलने करण्यात आली तरीही शासन नांदगाव तालुक्याकडे लक्ष देण्यास तयार नाही, तरी नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव व धनगर बांधव, भगिनी, वयोवृध्द तसेच परिवारासह आरक्षणासाठी व मुलभूत हक्कासाठी शासन दरबारी अगदी संयमाने भांडत आहे, आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, राज्यात सर्वत्र साखळी उपोषणे चालु असून अन्नत्याग, मुंडन सारख्या अनेक मार्गांने शासनाविरोधात आंदोलने चालु आहेत तरी शासनाने तात्काळ सदर आंदोलनाची गांभीर्याने दखल घेवून कायद्यास अनुकूल असणारे आरक्षण देवून राज्यात कायदा व सुव्यवस्था स्थापित करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासनास करण्यास आली आहे तसेच राज्यातील सदर गंभीर परिस्थितीबाबत शासनाला जाग आणण्यासाठी नांदगाव तालुक्यातील सर्व जनता, शेतकरीबांधव, माताभगिनी यांच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी व शिवसेनेशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटना निवेदन नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आले.या वेळी मोठ्या संख्येने पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या