 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मालेगावात साडेसोळा लाख रुपयांचा गुटखा जप्त, दिवसभरात आणखी तीन गुटखा विक्रेत्यांना अटक.
नाशिक ग्रामीण पोलीसांची अवैध व्यवसाय विरोधी मोहीम, मालेगावात साडेसोळा लाख रुपयांचा गुटखा जप्त, दिवसभरात आणखी तीन गुटखा विक्रेत्यांना अटक
आज दिनांक ०६ / ११ / २०२३ पासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी अभियान- ०५ सुरू केले असून, या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पानटप-या व गोडाऊन तपासण्याचे काम सुरू आहे.
आज पहिल्याच दिवशी विशेष पथकांनी जिल्हाभरात सुमारे २०० पानटप या तपासून गुटख्याची विक्री करणा-या तीन पान टपरी चालकांविरुद्ध कलम ३२८ भादवि खाली गुन्हे नोंदवले आहेत. सदर कारवाईत, पोलीस ठाणे वाडीव-हे येथे दोन तर पोलीस ठाणे येवला शहर येथील एका पान टपरी चालकाचा समावेश आहे.
मालेगाव तालुक्यातील मौजे पाटणे येथे मालेगाव तालुका पोलीसांना एका बंद घरात पत्त्याचे शेडमध्ये एक लाख तीस हजार रुपयांचा गुटखा मिळून आला होता. सदर प्रकरणी मालेगाव येथील दादा मिया मंसूरी या इसमास अटक करण्यात आली होती. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने सदरचा गुटखा हा धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावातून आणल्याची कबुली दिल्याने, पोलीसांनी पुरमेपाडा येथे धाड टाकून आणखी पंधरा लाख वीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सदरचा गुटखा हा मालेगाव शहरात विक्री होत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
यासोबतच, येवला शहरातून ग्रामीण भागात देशी-विदेशी दारूची वाहतूक करणा-या जितेंद्र विष्णुपंत बोडके रा. विंचूर रोड, पटेल कॉलनी, येवला येथील इसमास अटक करून त्याच्याकडून ४४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, तोंडवळ फाटा, पेठ येथे देखील हातभट्टी दारूची विक्री करणा-या एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, नाशिक ग्रामीण घटकातील वाहतूक पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूक व वाहनांच्या कागदपत्रांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आज दिवसभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या एकूण ६० वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून २४,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या