Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

हिसवळ बुः येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट शेतकरी भयभीत


 हिसवळ बुः येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट शेतकरी भयभीत

नांदगाव - दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. सुमारास हिसवळ बुः येथील शेतकरी ह .भ. प .ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांची गाई शेतात चरण्यासाठी गेल्या असता त्यातील एक माळवी वासरी (वय 2 वर्ष) च्या मागे कुत्रे लागले असता सदर कुत्र्यांनी वासरीला चावे घेतले व तिला खाली पाडत शिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजूबाजूच्या गुराख्यांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे वासरी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. तसेच सदर बासरीचे दोन्ही कान तोडले तसेच उजव्या पायाजवळ मोठे कातडे पाडल्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टर जाधव यांनी 8 इंच टाके देऊन उजव्या पायाजवळील त्वचा शिवून काढली. व इतर औषधोपचार केले. या अगोदरही गावात भटक्या कुत्र्यांनी शेळ्या मेंढ्या बोकड यांचा फडशा पाडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी रक्त लागल्यामुळे ते आता मोठ्या जनावरांच्या मागे लागायला लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तरी प्रशासनाने व ग्रामपंचायतीने त्यांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांमधून ओरड होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या