नाशिक.मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरोधी अभियान छेडले असून जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी, स्थापित करण्यात आलेल्या ०८ विशेष पथकांसह अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून महिला पोलीस अंमलदारांची ०३ पथके देखील गठीत करण्यात आली आहेत. जिल्हयातील अवैध मटका-जुगार, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, अन्न भेसळ यासह सर्वच प्रकारच्या व्यवसायांवर कारवाया करण्यात येत आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील गुटखा हद्यपार करण्यासाठी यापूर्वी तीन अभियान राबवले असून दिनांक ०६/१०/२०२३ रोजीपासून गुटखा विरोधी अभियान ४.० सुरू करण्यात आले आहे. मागील (८) दिवसांत नाशिक ग्रामीण पोलीसांनी, अवैध व्यवसायांविरुद्ध एकूण ७० ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली आहे. यात मुंबई दारूबंदी कायद्याखाली ३६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली १५ गुटखा विरोधी १८ कारवायांचा समावेश असून निफाड पोलीस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पथकांनी केलेल्या सदर कारवायांत एकूण ११९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण १८ लक्ष १७ हजार रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी जबर ही हेलालाईन सुरू केली असून, नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या