 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003 |
नाशिक.पोलीस स्टेशनला दाखल होणारे सर्व गुन्हे, आरोपी वासह सर्व पोलीस कामकाजाची माहिती संगणकीय यंत्रणेत भरून ती जतन करण्यासाठी सन २०१५ पासून सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रैकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स्) ही यंत्रणा देश पातळीवर सुरू करण्यात आली आहे.
राज्यभरातील पोलीस घटकांकडून चालणारे सीसीटीएनएस कामकाजाचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून दरमहा परीक्षण केले जाते.
माहे जुलै २०२३ या महिन्याच्या मूल्यमापनात नाशिक ग्रामीण घटक प्रथम क्रमांकावर आला होता. नुकतेच ऑगस्ट २०२३ चे मूल्यमापन जाहीर झाले असून यातही नाशिक ग्रामीण घटकास अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. याप्रमाणे नाशिक ग्रामीण घटकाने सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसऱ्यांदा मिळविला आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सीसीटीएनएस शाखा कार्यरत असून या शाखेत काम करणाऱ्या महिला अंमलदार मपोना/ सिमा उगलमुगले, मपोना/ ज्योती आहिरे, मपोशि/ प्रतिभा शिंदे व मपोशि/ कविता भोर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या सर्वांचे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या