 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मराठा आरक्षणासाठी मनमाड शहरात साखळी उपोषण.
मनमाड.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाड नगरपरिषद येथे आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र हे आश्वासन न पाळल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मनमाड येथे सकल मराठा समाज, संघटना पदाधिकारी आदी आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील खासदार आमदार व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी राजीनामा द्यावा व उपोषणास पाठिंबा द्यावा असे बॅनर साखळी उपोषणात दिसून आले . त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे विविध आंदोलन सुरू राहील अशी ग्वाही आंदोलकांच्या तर्फे देण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या