Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात 'स्वच्छता हिच सेवा' अभियानाअंतर्गत श्रमदान.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभरात ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक तास श्रमदानातून 'स्वच्छता हिच सेवा' या उपक्रमाचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे अधिकारी व अंमदारांकडून श्रमदान करण्यात आले.


०१ ऑक्टोबर रोज सकाळी १०:०० वाजता नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व पोलीस मुख्यालयातील अंमलदार यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, नियंत्रण कक्ष, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस परेड मैदान, पोलीस वाचनालय, उपहारगृह, बहुउद्देशीय हॉल व पोलीस निवासस्थाने अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्यालयातील विविध शाखांमध्ये अंतर्गत व बाह्य परिसरात साफसफाई करण्यात आली.


यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासोबतच कचरा वर्गीकरण, कच-याचा पुनर्वापर, प्लॅस्टिक वापरास पर्याय शोधणे, प्रसाधनगृहांची स्वच्छता इत्यादी बाबींचे महत्व उपस्थितांना समजावण्यात आले. स्वच्छतेमुळे कार्यालयीन कामकाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याने सर्वांनी आप-आपले कामकाजाचे ठिकाण व परिसरात स्वच्छता ठेवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी करून सर्वांना महात्मा गांधी जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या