शेतकऱ्यांच्या कांदा लिलाव सुरु करावे अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला.
मनमाड.कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू व्हावा या करिता बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहराच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समितीत सभापती व सचिव यांना निवेदन देण्यात आले. येत्या एक दोन दिवसात कृषि उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेेडले, त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील, निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांदा मालावर 40 टक्के निर्यात कर लागू केल्याने त्याविरोधात कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. म्हणून महाराष्ट्रातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्या गेल्या 10 ते 15 दिवसांपासून बंद आहेत. याचे सर्वात मोठे नुकसान बळीराजाराला सोसावे लागत आहे. गेल्या वर्षापासून मोठ्या संकटांना दोन हात करत शेतकऱ्यांनी सदर कांद्याचे पिक घेऊन तो साठवून व जपून ठेवला होता. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. उभ्या कांद्याच्या पिकात गारपीटीचे पाणी गेल्याने कांदा खराब झाला होता तसेच तो खराब होईल म्हणून तो शेतकऱ्यांनी मार्केट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सदर कांदा विक्रीसाठी आणल्याने नफेखोर व्यापाऱ्यांनी सदर कांदा 100, 200, 400 रूपयात क्विंटल प्रमाणे विकत घेतला. यामुळे शेतकऱ्याचे पुरते कंबरडे मोडले याचा सर्वांत जास्त फायदा व्यापाऱ्यांचा झाला. तेवढ्या संकटातूनही वाचून ठेवलेला कांदा मार्केट अभावी सडतो आहे. याला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण आता कांद्याला बऱ्यापैकी भाव भेटून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तो होऊ द्यायचा नाही असे धोरण केंद्रातील मोदी सरकारने आखल्याने त्याधोरणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली आहे. शासनाने व प्रशासनाने कांद्याचे लिलाव पुन्हा त्वरीत सुरु करावे व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावे, शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव उतरविण्यासाठी नाफेडने कांदा बाजारात आणू नये. शेतकऱ्यांच्या कांदा पिकावरील निर्यात शुल्क पुर्णपणे हटवावे.
असे निवेदन देण्यात आली यावेळी प्रविण डी पगारे नांदगाव विधानसभा अध्यक्ष,विकास लहिरे नांदगाव विधान सभा महासचिव,गौतम गायकवाड मनमाड शहराध्यक्ष, दिपक गायकवाड, एजाज शेख,कैलास गायकवाड,कैलास लहिरे,लक्ष्मण चव्हाण,सागर त्रिभुवन,किशोर भाटे,कुणाल अंकुश,विजू रोकडे,नरेश जाधव,रामभाऊ पाटील,करण पाटील,संतोष गायकवाड,सोमनाथ लहिरे,अनिल चव्हाण,पंकज पगारे,अशोक आव्हाड,साहेबराव धिवर,योगेश गायकवाड, रघुमामा,आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या