Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात 'ईद-ए-मिलाद'चा सण मनमाड शहरात उत्साहात साजरा,


इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात 'ईद-ए-मिलाद'चा सण मनमाड शहरात उत्साहात साजरा.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.

 या वेळी मनमाड शहर मुस्लिम बांधवांनी, सामाजिक सलोखा  राखत, हिंदू बांधवांचे सण गणेश विसर्जन मुळे, 'ईद-ए-मिलाद' जुलूस मिरवणूक ही दोन दिवस पुढे वाढवली 

शनिवारी (दि.३०) ईद-ए-मिलाद'च्या दिवशी मनमाड शहरात विविध मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हिरवे झेंडे घेऊन आबालवृद्धांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यंदाची मिरवणूक गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरली .


विद्युत रोषणाई, हिरवे झेंडे आणि पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध ठिकाणी सरबत, खीर, फळांचे वाटप करण्यात आले.तर विविध ठिकाणी जुलूस मिरवणुकीत मौलाना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचे सत्कार करण्यात आले, 


नुर चौक, पाकिजा कॉर्नर ,नगीना मस्जिदसमोरून उस्मानीय चौक,एकात्मता चौक, रेल्वे स्टेशन समोरून, ५२ नंबर, नेहरू भवन, आठवडे बाजार,जामा मस्जिद येथे मिरवणूक नेत सांगता करण्यात आली. अनेक ठिकाणी हिरवे ध्वज, पताका, विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते, 

मनमाड शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मुस्लिम बांधवांनी पोलिसांचा तसेच पोलिसांनी देखील मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या