Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

“जागतिक औषधनिर्माता दिवसानिमित्त” मनमाड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले.


 “जागतिक औषधनिर्माता दिवसानिमित्त” मनमाड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड.आज दि. २५/०९/२०२३ सोमवार रोजी “जागतिक औषधनिर्माता दिवस २०२३” , मनमाड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तर्फे विविध उपक्रम खेळीमेळी ने साजरे करण्यात आले. ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सर्व औषधनिर्माता यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. जिल्हा परिषद शाळा शिवाजी नगर क्रमाक.१, नेहरू भवन शाळा व आश्रम शाळा निमोन रोड, डोणगाव येथे शालेय साहित्य वाटप व प्रथम उपचार किट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.


तसेच ग्रंथसाहिब गुरुद्वारा, बस स्टैंड व पोलिस स्टेशन, मनमाड येथे प्रथम उपचार किट व गरजे चे औषधे मोफत वाटप करण्यात आले. मनमाड केमिस्ट  अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या  वतीने नांदगाव तालुका EC मेंबर श्री सुनील बोगावत, माजी EC मेंबर श्री विनोद मुनोत तालुका अध्यक्ष श्री सचिन लुणावत, माजी तालुका अध्यक्ष श्री मनेश काकलीज व श्री योगेश ताथेड, मनमाड केमिस्ट असोसिएशन चे शहर अध्यक्ष श्री समीर निकम, उपाध्यक्ष श्री सोहेलभाई जाफरी, उपाध्यक्ष श्री निखिल लुणावत, सचिव श्री प्रशांत आहेर, सहसचिव श्री मनिष कुंजरकर, संघटनेचे आधारस्तंब व बुलंद तोफ श्री देवेंद्र गवांदे, श्री किरण रसाळ, श्री रवींद्र वासकर व श्री आसिफभाई खान यांच्या शुभ हस्ते विविध उपक्रम करण्यात आले. औषधनिर्माता हा देशाचा एक समाजरत्नच होय व त्याचा कार्य हे समाज घडवण्यात किती मोलाचे असते हे ह्या उपक्रमा द्वारे सार्वजनिक रित्या सर्वांना सांगण्यात आले. औषधनिर्माता व त्यांचे सहकारी श्री जिवन खताळ, श्री अमोल देवरे, श्री सचिन राऊत, श्री पियुष भंडारी, श्री रितेश ललवाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मनमाड पोलिस निरीक्षक श्री बाळासाहेब थोरात. यांनी केमिस्ट संघटनेचे कौतुक करत, औषधनिर्माता देशाचा व समाजाचा किती महत्वाचा घटक असतो हे सांगून संघटनेची पाठ थोपटली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या