Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,यांचे दालना बाहेर नागरिकांचे ठिय्या आंदोलन,

 


जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

नाशिक जिल्हा निफाड तालुका येथील मरणगोयी खुर्द या गावात शंभर टक्के भ्रष्ट्राचार झाले आहे,नागरिकांतर्फे तक्रारी देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी तर्फे कारवाई केले जातं नाही,

तक्रारदार हे जिल्हा परिषद येथे वारंवार चकरा मारून सुद्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी हे भेटत नाही, कधी मिटिंग,तर कधी VC च्या नावाखाली, तक्रारदार यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन काढून दिले जातं आहे,

वरिष्ठ अधिकारीच हे खालच्या अधिकारीना संरक्षण देत आहे, असे आरोप करत नागरिकांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,यांचे दालना बाहेर नागरिकांचे ठिय्या आंदोलन केले, 




या देश्यात 140 कोटी नागरिकांनी नागरिकांसाठी लोकशाही निर्माण केलेली आहे, या लोकशाहीत नागरिक हे देशाचे मालक आहेत, शासकीय सेवक हे नोकर आहे, जर देशाचे मालक नोकराला सांगत असेल की भ्रष्ट्राचार झाला आहे, तर नोकर का कारवाई करत नाही,?

खालून तर वर पर्यंत भ्रष्ट्राचाराचे टक्केवारी फिक्स झालेले आहे, शासकीय लोकसेवक नोकर भ्रष्ट्राचार करून मोजोरी करत आहे, पोताभर पुरावे देऊन सुद्धा भ्रष्ट्रअधिकारिंवर कारवाई होत नाही, म्हणून आम्ही या सर्व घटनेच्या निषेधार्थ मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालया समोर सदर ठिय्या आंदोलन केले आहे, असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या