Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

धनगर आरक्षण कृती समितीचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा .

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.



धनगर आरक्षण कृती समितीचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा .

नांदगाव : सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नांदगाव तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि. २९) नांदगाव तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिमंदिर उद्यान येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाजवळून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात येणार असून, मोर्चात तालुक्यातील हजारो धनगर बांधव सहभागी होणार आहेत. तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना याबाबत निवेदन तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेंढ्या, शेळ्यांसह तसेच पारंपरिक वाद्यासह हुतात्मा चौक येथे रास्तारोको करून आंदोलन करण्यात येणार आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की.यशवंत सेना महाराष्ट्र राज्य दिनांक - ०६/०९/२०२३ पासून अहिल्यादेवीचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे आमरण उपोषण चालू आहे. परंतु सरकार पातळीवर ठोस असा निर्णय झालेला नाही. म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समिती नांदगाव तालुक्याच्या वतीने दि- २९/०९/२०२३ वार-शुक्रवार रोजी शनिमंदिर गार्डन ते तहसील कार्यालय असा शेळ्या मेंढ्या सह आंदोलन करण्यात येणार आहे.

अंदोलनाच्या प्रमुख मागण्या 
1) धनगर ST आरक्षणाची केस सरकारने फास्ट ट्रक वर चालवावी. तशी सरकारी वकिलांनी मा. न्यायालयास मागणी करावी.

2) ST प्रवर्गात समावेश होईपर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी दहा हजारकोटींची तरतूद करावी. 

3) मेंढ्यांना व मेंढपाळ यांना मोफत विमा देण्यात यावा.
4) मेंढपाळांना मेंढपाळ सरक्षण कीट शंभर टक्के अनुदानावर यावे. त्यात पुढील बाबींचा समावेश असावा. सोलर चूल सोलर बटरी बैलगाडी ताडपत्री व स्वसंरक्षणासाठी बंदुक देण्यात यावी इ. 

5) दुष्काळाची भीषण परीस्थिती पाहता मेंढ्यासाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात.

6) ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यासाठी इस्राईल सारख्या देशात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. त्याचप्रमाने मेंढपाळ याना प्रशिक्षण देण्यासाठी दक्षीण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ. सारख्या देशात पाठविले पाहिजे. याचा पूर्ण खर्च सरकारने करावा.

7) राज्य सरकारने लक्ष घालून विदेशी / देशी (DORPER)नारी सुवर्णा, अविशान संकरित मेंढ्यांची अनुदान तत्वावर वाटप करावी.

 8) मेंढपाळावरील होणारे प्राणघातक हल्ले व संरक्षणासाठी विशेष कायदा तयार करण्यात यावा. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या