Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

धार्मिक ग्रंथाची विटंबणा प्रकरणी कोपरगाव तहसीलवर पुकारलेल्या अमरण उपोषणास समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे,उपस्थिती देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आले,

 

धार्मिक ग्रंथाची विटंबणा प्रकरणी कोपरगाव तहसीलवर पुकारलेल्या अमरण उपोषणास समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे,उपस्थिती देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आले.

जन आवाज न्युज.

मनमाड :- अहमदनगर जिल्हा तालुका कोपरगाव येथील कोळपेवाडी,(कोळगाव थडी) येथे काही समाजकंटकांतर्फे धार्मिक ग्रंथांची जाळपोळ करून विटंबणा करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ व आपलसंख्यांक संरक्षण कायदा मांगणी करीता, मनमाड शहरात काही दिवसा पूर्वीच समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे मुक मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले होते, या मोर्च्यात हजारोच्या संख्येने अल्पसंख्यांक बहुजन बांधवांनी हजेरी देऊन आपले सक्रिय सहभाग नोंदविला होता,

 या घटने संदर्भात कोपरगाव तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुजन बांधवांनी, आरोपीनां अटक करून कठोर शासन करावे या मागणी करिता, तहसील कार्यालय कोपरगाव येथे दि 22/08/2023 रोजी अमरण उपोषण पुकारलेले आहे, त्यांच्या या आंदोलन अमरण उपोषणात, कोपरगाव येथे उपस्थित होऊन 
समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला, व आरोपी अटक करून कठोर कारवाई करा 

अन्यथा आमच्या संघटना च्या वतीने आंदोलन केले जाईल असा ईशारा देण्यात आला,या वेळी मा, गणेश एळींजे, जुबेर माणियार, शकील शेख, कादिर शेख, मोसीन शेख, कयाम सैय्यद, स्यांडी आहिरे, भाऊराव शिंदे (एडवड ) हाजी मोहसीन (दादा भाई येवले वाले ) पंकज आंबोळे, इरफान शेख, सिकंदर पठाण, समीर शेख, मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या