Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

खिदमत ए खल्क फाउंडेशन, तर्फे मनमाड शहरातील गरजु विद्यार्थिना शालेय साहित्य व वह्या वाटप,



 जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.

मनमाड :- सर्व शिक्षण अभियान अंतर्गत, तसेच शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत, शासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे व गरजेचे केले असून शासनाने या साठी शिक्षणाचे बजट देखील नियोजन केले आहे,

शासनातर्फे विद्यार्थिना शालेय गणवेश सोबत पुस्तक देखील मोफत मिळते, परंतु विद्यार्थीना शिक्षणासाठी गरजेचे असलेले वह्या दिले जात नाही,

गोरगरीब विद्यार्थिच्या पालकांना वह्या विकत घ्यावे लागते त्या साठी मोठा आर्थिक त्रास सहन करावं लागतो


आर्थिक परस्थिती नसल्याने कित्तेक विद्यार्थी हे जुने अथवा बिन व्ह्याचे शिक्षण घेत आहे असे निदर्शनास येत आहे, यांची गांभीर्याने दखल घेऊन, 
खिदमत ए खल्क फाउंडेशन, मनमाड, तर्फे सामाजिक बांधिलकीतून, इकरा उर्दू स्कुल, व मौलाना अबुल कलाम आझाद प्राथमिक शाळा,व डॉ जाकीर हुसेन प्राथमिक शाळा, या शाळेतील गोरगरीब गरजु विद्यार्थिना मोफत शालेय साहित्य वह्या वाटप करण्यात आले आहे,


या वेळी इकरा उर्दू स्कुल, व मौलाना अबुल कलाम आझाद,व डॉ जाकीर हुसेन प्राथमिक शाळा, शिक्षकांतर्फे खिदमत ए खल्क फाउंडेशन मनमाडचे आभार व्यक्त करण्यात आले,
भविष्यात विद्यार्थिना शिक्षणासाठी कोणतेही अडचण आल्यास आम्ही त्या अडचणीचे निराकारण तात्काळ करू,आम्ही गरजु विद्यार्थिच्या मदतीसाठी सदैव हजर असु अशी ग्वाही खिदमत ए खल्क फाउंडेशन, मनमाड, तर्फे शाळेना देण्यात आली, या वेळी फाउंडेशन चे पदधिकारी, मौलाना तौसिफ़, मौलाना कामील,कयाम सैय्यद,इमरान कादरी, जावेद भाई (इमेज कलेक्शन )सलीम मंसुरी, इमरान खान (सर )आफताब शेख,हुजेफा खान, सोहेब तांबोळी, सद्दाम अत्तार, शब्बीर शेख, कादिर शेख, इतर पदधिकारी उपस्थित होते,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या