शासकीय धान्य गोडाऊन अधिकारी गैरहजर, शेकडो टन धान्य बेकायदेशीर वितरण.? झालेल्या काळाबाजारीची चौकशी व्हावी,
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.
मनमाड :- शासनातर्फे लक्ष निर्धारित सार्वजणिक वितरण व्यवस्था अंतर्गत गोरगरिबांना धान्य वितरण केले जाते,परंतु स्थानिक पातळीवर परस्थिती वेगळी व विचित्र आहे,
मनमाड :- शासकीय धान्यगोडाऊनला गोदामपाल हे जबाबदार अधिकारी असतात, रास्तभाव (रेशन) दुकानदाराला शासनाने ठरवून दिलेल्या नियतन प्रमाणे धान्य वितरण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असते, असे असतांना देखील, दि 11/07/2023 रोजी मनमाड शहर शासकीय धान्यगोडाउनला गोदामपाल हे गैरहजर होते, परंतु त्यांच्या गैरहजरीत धान्य गोडाऊन व गोदामपाल यांचे कार्यालय सुरु होते,दि 11/07/2023 रोजी सकाळ पासून धान्यगोडाऊनवर रेशन दुकानदारांचा कबजा होता, अधिकारी गैरहजर असतांना कार्यालय सुरु कसे झाले.? कार्यालय उघडून सरकारी धान्य वितरण कसे करण्यात आले आहे,?या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे,
प्रकरण घडले असे की, पुरवठा विभागाच्या तालुका दक्षता समिती मा,सदस्य भीमराज लोखंडे व भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तालुका उपाध्यक्ष कादीर शेख, हे कामा निमित्त मनमाड शहर शासकीय धान्यगोडाऊन कार्यालयात गेले असता, कार्यालय गोदामपाल अधिकारी उपस्तीथ नसतांना त्यांचे आसनावर (खुर्चीवर ) राशन दुकानदार बसून त्यांचे कम्प्युटर वापरत शासकीय कामकाज पार पाडत होते, गोडाऊन कार्यालयात इतर राशन दुकानदार देखील बसलेले होते, त्या वेळी गोदामपाल,अधिकारीच्या खुर्चीवर बसलेल्या राशन दुकानदारास विचारणा करण्यात आली की, गोदामपाल अधिकारी कुठे आहे.? व इतर कर्मचारी व अधिकारी कुठे आहे,
त्यावर रेशन दुकानदाराने माहिती दिली की, गोदामपाल हे सुट्टीवर आहे, ते आज येणार नाही व आज गोडाऊन मध्ये कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी हजर नाही,
मंग संबंधित राशन दुकानदारास विचारणा करण्यात आली की , अधिकारी नसतांना कार्यालय सुरु कसे, व धान्यवितरण कसे होत आहे, त्यावर राशन दुकानदारांनी उडवाउडवीचे उत्तरे देत पळकाढण्याचा प्रयत्न केला,
हा काळा बाजार सुरु आहे अशी शंका झाली म्हणून भीमराज लोखंडे यांनी थेट नांदगाव तालुक्याचे तहसीलदार यांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली,
तहसीलदार साहेब यांनी सांगितले की असे तर शक्य नाही,गोदामपाल नसतांना कार्यालय उघडे कसे राहील,
साहेबांना सांगितले की आम्ही GPS लोकेशन फोटो काढले आहे, तुम्हाला पुरावे म्हणून पाठवतो,
तहसीलदार साहेब यांनी आम्हाला धान्य वितरण तात्काळ थांबवून गोडाऊन बंद करण्याचे व नांदगाव वरून अर्जंट अधिकारी पाठवण्याचे आश्वासन दिले,
तो पर्यंत, शेकडो टन धान्यांनी भरलेले गाड्या निघून गेले होते, गोर गरिबांना मिळणारे शासनाचे शेकडो टन धान्य हे काळाबाजार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.? कारण शासकीय गोडाऊनचे CCTV कॅमेरे देखील बंद पडले आहे, ते कॅमेरे जाणूनबुजून बंद तर ठेवले जात नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे,
या सर्व गैरप्रकाराचे, शासनाने दखल घेऊन,या भ्रष्टाचाराला वरद हस्त कोणाचा आहे.? चौकशी करावी कारण सदर प्रकरणात तालुका व जिल्हा पातळीवरचे अधिकारी यांचं पाठबळ असल्याची दाट शक्यता आहे,राशन दुकानदार पाठबल मिळाल्या शिवाय असे कृत्य करणार नाही,?
गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास पळणाऱ्या शक्यता नाकारता येत नाही, या भ्रष्टाचारी लोकांवरती शासनाने तात्काळ कारवाई करावी,
अशी मांगणी तालुका दक्षता समिती मा,सदस्य भीमराज लोखंडे व भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तालुका उपाध्यक्ष कादीर शेख, यांनी केली आहे,




0 टिप्पण्या