सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ईकबाल बाबा यांचे निधन; मनमाड शहरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मनमाड: शहराचे भूमिपुत्र आणि खुल्दाबाद येथील प्रख्यात सुफी संत हजरत ईकबाल बाबा यांचे मूळ गावी मनमाड येथे निधन (विसाल) झाले. मनमाड शहर कब्रस्तानात हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर (दफननविधी) करण्यात आले.
हजरत ईकबाल बाबा यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ सुफी संप्रदाय आणि इस्लाम धर्माच्या शांतता, बंधुभाव व मानवतेच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार केला. देशभरात त्यांचे लाखो मुरीद (शिष्य) आहेत. जवळपास चार दशकांनंतर ते आपल्या जन्मभूमीत मनमाड येथे आपल्या घरी परतले होते.
त्यांनी अंतिम क्षणीही शिष्यांची काळजी घेत दान केले. मनमाड येथील आपल्या निवासस्थानी असताना त्यांनी सर्व भाविक-शिष्यांना एकत्र बोलावले. यावेळी त्यांनी एका शिष्याकडे २२ हजार रुपये सुपूर्द करत, "माझ्या मृत्यूनंतर या पैशांतूनच कफन व अंत्यविधीचा खर्च करावा," अशी वसीयत केली.
इतकेच नव्हे, तर माझ्या "अंत्यदर्शनासाठी लांबून येणाऱ्या कोणत्याही (मुरीद ) शिष्य भक्ताला उपाशी जाऊ देऊ नका," असे बजावत त्यांच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पैसे दिले.
अंतिम निरोपाची भेट घेताना त्यांनी उपस्थित प्रत्येक शिष्याला स्मृती म्हणून आपल्यातर्फे ५०० रुपयांची भेट दिली. त्यानंतर अत्यंत शांत चित्ताने दुवा, पठण करत अल्लाह ताआला आणि पैगंबर साहेबांच्या नामस्मरणात त्यांनी आपले प्राण त्यागले.
सुभाष रोडवरील त्यांच्या वडिलोपार्जित घरातून कुटुंबीय व हजारो शिष्यांच्या उपस्थितीत जनाजा (अंत्ययात्रा) काढण्यात आली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली अंत्यविधीची प्रक्रिया पहाटेपर्यंत चालली. मनमाड शहर कब्रस्तानातील पठाण बावा यांच्या कबरीजवळ हजरत ईकबाल बावा यांच्या पार्थिवाचा दफनविधी पूर्ण करण्यात आला. त्यांच्या निधनाने सुफी संप्रदायासह संपूर्ण परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या