Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

विठ्ठल रखुमाई ग्रुपच्या जेष्ठ सदस्या सुरेखा धुमाळ सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित--

 


नासिक येथे मनु मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गौरव---

मनमाड जन आवाज न्युज.राजेंद्र धिंगान 
अध्यात्मिक क्षेत्रात महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविलेल्या तसेच अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनकार, शासकीय अधिकारी, समाजसेवक,सहकार महर्षी, जेष्ठ पत्रकार आदींच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचच्या मुख्य सदस्या सुरेखाताई धुमाळ (मनमाड) यांना नासिक येथे संपन्न झालेल्या मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुपर वुमन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंच मुख्य संचालक   .
  पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  आदित्य सिंग राजावत विमा तज्ञ, मॅक्स लाईफ इन्शुरन्स क.लि, श्वेता कटारिया अकाउंट क्लासेस, LIC एजंट, डॉ. सुनिता टावरी वास्तू तज्ञ, LIC एजंट, कार्यक्रम आयोजक
सौ.मेघा शिंपी संस्थापिका अध्यक्षा.सौ.राजनंदिनी आहिरे मार्गदर्शक सदस्या,सौ.विनया नागरे कायदेशीर सल्लागारआदी होते.
  श्रीमती सुरेखा धुमाळ यांना सुपरवुमन पुरस्कार सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरविण्यात आले.श्रीमती सुरेखा धुमाळ यांना सुपरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक,   विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच मार्गदर्शक भागवताचार्य शुभदाताई लोहार, भागवताचार्य वर्षाताई काळे /कोकाटे, रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ ,भागवत कथाकार विठोबा दादा आवारे हभप विनायक महाराज वाघ, रामायणाचार्य हभप मिनाताई महाराज मडके, हभप दिपाली ताई घोडके,रामायणाचार्य राम महाराज उदागे, मुख्य संचालक तथा वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य हभप सीमाताई काळे चांदवड, सौ कांताताई इंगळे घाटकोपर, सदस्य नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे ,प्राचार्य सी डी रोटे सर विंचूर, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर नाशिक ,गवळी एन पी सर विंचूर ,अशोकराव पगार सर मनमाड, लक्ष्मण आवारे सर चांदवड, रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव, नाथभक्त उमेश आप्पा चव्हाण दरसवाडी, ललिता पगार, सौ सुनिताताई जगताप,सौ संगिताताई पाटील, सुवर्णा निकम, विद्याताई जगताप, सौ रेखाताई येणारे,सौ सुनिता बागोरे,सौ ज्योतीताई मावरे,सौ पुष्पाताई पवार,सौ कमलताई गायकवाड,सौ मनिषा भोर, भास्कर आबा मांजरे, शंकरराव भवर अरुण भाऊ घायाळ,सौ जयाताई निचीत आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या