माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर शाखेतर्फे अभिवादन
मनमाड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहर शाखेच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी माँसाहेब, वंदनीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुक्तांगण येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत शिवसैनिक जाफर मिर्झा यांनी या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. रेणुकांताई जयस्वाल, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर, शहरप्रमुख माधव शेलार, दुर्वा विनय आहेर आदींच्या हस्ते माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “अमर रहे, अमर रहे, माँसाहेब अमर रहे” अशा घोषणा देत प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मातृतुल्य, स्नेहाळ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिवसेनेच्या जडणघडणीत तसेच शिवसैनिकांना ऊर्जा आणि आधार देण्यात माँसाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राजाभाऊ कासार, राजाभाऊ धोंडगे, युवासेना उपजिल्हाधिकारी आशिष घुगे, तालुका सचिव शैलेश सोनवणे, माजी नगरसेवक विनय आहेर, उपशहरप्रमुख राजाभाऊ वाघ, कचरू आव्हाड, संतोष साळुंके, राकेश अहिरराव, वसंत नागरे, बबन आव्हाड, सिद्धांत पाटील, चेतन चावरिया, शहर संघटक विजय परदेशी, विजय शिनगारे, योगेश परदेशी, काळू माळी, बाळासाहेब सुपेकर, युवासेनेच्या प्रियांजली जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या