मनमाड (प्रतिनिधी) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कथितरित्या अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहर शाखेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी मनमाड शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक करेसाहेब यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांच्याबद्दल करण्यात आलेले कथित आक्षेपार्ह वक्तव्य शिवसैनिकांच्या व जनतेच्या भावना दुखावणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सदावर्ते यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप करत, अशा वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक करेसाहेब यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहरप्रमुख माधव शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र आहेर, अशोक पदमर, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख मुक्ताताई नलावडे, तालुका सचिव शैलेश सोनवणे, नगरसेवक दीपक दराडे, अमोल नरवडे, संजय कटारे, माजी नगरसेवक विनय आहेर, मायकल फर्नांडीस, उपशहरप्रमुख प्रवीण धाकराव, राजाभाऊ वाघ, संतोष साळुंके, राकेश अहिरराव, वसंत नागरे, सुभाष दरगुडे, संजय सोळसे, बबन आव्हाड, सिद्धांत पाटील, प्रकाश चावरिया, विजय शिनगारे, योगेश परदेशी, गणेश सांगळे, सुनील जाधव, काळू माळी, राहुल वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.निवेदनाचे आयोजन निष्ठावंत शिवसैनिक जाफर मिर्झा यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या