नांदगाव | प्रतिनिधी : नांदगाव तालुक्यात मिशन भगीरथ योजनेअंतर्गत झालेल्या सिमेंट प्लग बंधाऱ्यांच्या कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचा दावा प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या नावाखाली, ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवकांना विश्वासात घेऊन अथवा दिशाभूल करून अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आता या चौकशीत नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जातेगाव येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचीही चौकशी लवकरच होणार असल्याचा दावा संदीप सूर्यवंशी यांनी केला आहे. या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विकासकामांच्या नावाखाली शासनाचा निधी खर्च केला जात असताना कामांचा दर्जा, प्रत्यक्ष लाभार्थी, मोजमाप, बिलांची प्रक्रिया आणि कामाची गुणवत्ता यांची स्वतंत्र व निष्पक्ष तपासणी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका प्रहार शेतकरी संघटनेने घेतली आहे.
«“अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. चौकशीच्या माध्यमातून संपूर्ण कारभार जनतेसमोर आणला जाईल,” असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी दिला.» आता मिशन भगीरथ आणि जल जीवन मिशनमधील संबंधित कामांची चौकशी किती पारदर्शकपणे होते, कोणत्या त्रुटी समोर येतात आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर शासन काय कारवाई करते, याकडे नांदगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या