मनमाडच्या श्री नीलमणी गणेश मंदिरात यंदा ३०वा भाद्रपद महागणेशोत्सव
१४ ते २४ सप्टेंबरदरम्यान सलग १२ दिवस धार्मिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल; शिल्लक औषध संकलन उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष
मनमाड, प्रतिनिधी : मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत श्रद्धास्थान असलेल्या वेशीतील श्री नीलमणी गणेश मंदिरात यंदा भाद्रपद महागणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन १९९७ पासून सुरू असलेल्या या उत्सवाचे यंदा ३०वे वर्ष असून, श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सलग १२ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात सोमवार, १४ सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीनिमित्त सकाळी ९.३० वाजता श्रींच्या स्थापना पालखी महामिरवणुकीने होणार आहे. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ६ वाजता श्रींचा महाअभिषेक, तर रात्री ८ वाजता महाआरती होणार आहे. या धार्मिक सोहळ्यांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
‘आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो...’ हे ब्रीदवाक्य घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकीची परंपराही कायम ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून गरीब व गरजू रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेला ‘शिल्लक औषध संकलन उपक्रम’ यंदा सलग दहाव्या वर्षी राबविण्यात येणार आहे.
नागरिकांकडे वापरात न आलेली व एक्सपायरीची मुदत शिल्लक असलेली औषधे असल्यास ती गरजू रुग्णांच्या सेवेसाठी दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औषध संकलनासाठी ९६७३६९१९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा. ट्रस्टचे स्वयंसेवक संबंधित नागरिकांकडून औषधे संकलित करतील.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, संस्कृतीचे संवर्धन आणि सेवाभावाचा संदेश देणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने ट्रस्टकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या ३०व्या वर्षानिमित्त आयोजित महागणेशोत्सवात मनमाड शहर व परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच उत्सव काळात श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करून उत्सव शांतता, शिस्त व भक्तिमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या