Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक 'योग दिन' साजरा.

 


जन आवाज न्युज.
मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय प्रांगणावर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षक शानूल जगताप सर यांनी योगाचे महत्व व बदलत्या जीवन शैली मध्ये योगाची आवश्यकता व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.शाळेचे उपशिक्षक युनूस खान व प्रदीप पाटील यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक घेतले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या